अनंतनागमध्ये उत्खननात ऐतिहासिक प्राचीन हिंदू मूर्ती, शिवलिंग सापडले

Historic ancient Hindu idols, Shivling found during excavations in Anantnag
अनंतनागमध्ये उत्खननात ऐतिहासिक प्राचीन हिंदू मूर्ती, शिवलिंग सापडलेPudhari File Photo
Published on
Updated on

अनंतनाग; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील एका झर्‍याच्या नूतनीकरणासाठी सुरू असलेल्या उत्खननादरम्यान अनेक प्राचीन हिंदू मूर्ती आणि शिवलिंग सापडले आहेत. ऐशमुकाम परिसरातील सालिया येथील करकूट नाग येथे हा ऐतिहासिक ठेवा उजेडात आला असून, यामुळे या भागाच्या प्राचीन इतिहासावर नव्याने प्रकाश पडला आहे.

झर्‍याच्या नूतनीकरणावेळी मौल्यवान मूर्ती उजेडात

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सालिया येथील प्राचीन झर्‍याचे पुनरुज्जीवन आणि जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या कामासाठी शनिवारी उत्खनन करत असलेल्या मजुरांना काही दगडी मूर्ती आणि शिवलिंग आढळले. त्यांनी तात्काळ ही माहिती अधिकार्‍यांना दिली. या सापडलेल्या मूर्तींमुळे स्थानिक परिसरात कुतूहलाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मूर्तींचे वय आणि मूळ ओळखण्यासाठी त्यांची शास्त्रीय तपासणी केली जाईल. यासाठी त्यांना श्रीनगर येथील एसपीएस संग्रहालयात पाठवण्यात येणार आहे, जिथे संशोधक त्यांचा सखोल अभ्यास करतील.

कारकोट राजवंशाशी संबंध

हे स्थळ काश्मिरी पंडितांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण याचा संबंध 625 ते 855 इसवी सनादरम्यान काश्मीरवर राज्य करणार्‍या ’कारकोट’ राजवंशाशी जोडला जातो. या घटनेची माहिती मिळताच जम्मू-काश्मीरच्या पुरातत्व आणि संग्रहालय विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news