Highest Paying GOV Jobs: IAS, IPS सोडून कोणत्या सरकारी अधिकाऱ्यांना सुरूवातीलाच मिळतो २ लाखांपर्यंत पगार?

देशात RBI, SEBI आणि PFRDA सारख्या संस्थेत देखील अधिकारी होण्याची संधी असते.
Highest Paying GOV Jobs
Highest Paying GOV Jobspudhari
Published on: 
Updated on: 

Highest Paying GOV Jobs: प्रत्येक तरूणाला शिक्षण पूर्ण झाल्यावर एक अशी नोकरी मिळावी ज्यात चांगला पगार असावा अशी अपेक्षा असते. चांगला पगार म्हणजे भविष्य सुरक्षित असं ते समीकरण असतं. भारतात सरकारी नोकरीची विशेष क्रेझ असते. प्रत्येक पदवीधर एकदा तरी सरकारी नोकरीसाठी ट्राय करतोच.

मात्र सरकारी नोकरी म्हणजे फक्त IAS किंवा IPS बनने नाही. देशात RBI, SEBI आणि PFRDA सारख्या संस्थेत देखील अधिकारी होण्याची संधी असते. जिथं सुरूवातीला दीड ते दोन लाखापर्यंतचा पगार मिळू शकतो. जर तुम्ही चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्ही या संस्थामधील मोठ्या पदांसाठी अर्ज करू शकता.

Highest Paying GOV Jobs
Nashik Government jobs for 22 affected families|अत्याचारग्रस्त २२ कुटुंबांना शासकीय नोकरीचा आधार

IAS - IPS अधिकारी

भारतात सर्वाधिक क्रेज असलेली नोकरी म्हणजे UPSC मधून IAS आणि IPS ची नोकरी. ही नोकरी मिळावी म्हणून काही शेकडो जागांसाठी लाखात अर्ज येतात. या पदासाठी मिळणाऱ्या पगाराबाबत बोलायचं झालं तर या पदासाठी महिन्याला ५६,१०० ते २.५० लाखांपर्यंत पगार मिळू शकतो. त्याचबरोबर अनेक भत्ते आणि इतर सुविधा देखील मिळतात.

Highest Paying GOV Jobs
Baramati Government Job Fraud: सरकारी नोकरीच्या आमिषाने ११७ जणांची ३.७३ कोटींची फसवणूक; दोघांविरुद्ध बारामतीत गुन्हा

RBI ग्रेड B अधिकारी

आरबीआयच्या २०२६ च्या भर्ती अधिसुचनेनुसार ग्रेड B अधिकाऱ्याच्या पदासाठी बेसिक सॅलरी ही ७८,४५० रूपये प्रती महिना आहे. मात्र एकूण पगार हा १.५ लाखाच्या पुढे असू शकतो. बेसिक पगाराव्यतिरिक्त अधिकाऱ्यांना महागाई भत्ता, स्पेशल अलाऊन्स, ग्रेड अलाऊन्स, लोकल कम्पेन्सेटरी अलाऊन्स आणि काही नियमानुसात अजून काही भत्ते मिळतात.

Highest Paying GOV Jobs
Fake Government Job Scam: सरकारी नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांची लूट

सिव्हिल जज

कायद्याच्या क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना सिव्हिल जज पद सर्वाधिक आकर्षित करणारी नोकरी आहे. इथं काम करणं ही फक्त एक नोकरी नसून न्यायदानाची एक मोठी जबाबदारी तुमच्यावर येते. या पदासाठी मिळणाऱ्या पगाराबाबत बोलायचं झालं तर सिव्हिल जजचा महिन्याचा पगार हा १.२ लाखापासून २.८ लाखांपर्यंत असू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news