31डिसेंबरची ‘किक’ उत्तर प्रदेशला

देशात सर्वाधिक विक्री यूपीत; 600 कोटींचे मद्य रिचवले
Highest liquor sales in Uttar Pradesh
उत्तर प्रदेशात मद्याची सर्वाधिक विक्रीPudhari File Photo
Published on
Updated on

देशात नववर्ष जल्लोषात साजरे करण्यात आले. मद्यपींनी भरपूर मद्याचा आस्वाद घेतला आहे. देशात उत्तर प्रदेशाने मद्य विक्रीचा विक्रम नोंदविला आहे. उत्तर प्रदेशात मद्याची सर्वाधिक विक्री झाली आहे. उत्तर प्रदेशातील मद्य विक्रीचे आकडे अचंबित करणारे असून मद्य विक्रीत या राज्याने दिल्लीलाही मागे टाकले आहे.

1. उत्तर प्रदेशातील मद्यपींनी 600 कोटींची दारू रिचवली आहे, तर दिल्लीतील तळीरामांनी 400 कोटींचे मद्यपान केले आहे. 31 डिसेंबरच्या रात्री मद्यपींनी इंग्रजी आणि देशीचा पुरेपूर आस्वाद घेतला. केवळ नोएडामध्ये 16 कोटींची मद्य विक्री झाली आहे.

2. नव्या वर्षाचे स्वागत विविध पद्धतीने करण्यात आले. काहींनी मंदिरात पूजा करून नववर्षाचे स्वागत केले, तर काहींनी दानधर्म करून 2025 चे स्वागत केले. तरुणाईने पार्टी आणि नाईट क्लबमध्ये मद्य ढोसून नव्या वर्षाचे स्वागत केले.

3. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये दररोज दोन ते सव्वा दोन कोटींची मद्य विक्री केली जाते. 31 डिसेंबर रोजी मेरठमधील विक्री 4 कोटींवर गेली.

4. नववर्षाच्या स्वागत रात्रीत मद्य विक्रीत कर्नाटकमध्ये 308 कोटींची मद्य विक्री झाली आहे. तेलंगणातील लोकांनी त्या रात्री मद्यावर 402 कोटींवर खर्च केले आहेत. केरळमध्ये 108 कोटी, तर उत्तराखंडमध्ये 15 कोटींची विक्री झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news