भाडेकरु तरुणीच्या बाथरुम-बेडरुममध्ये छुपे कॅमेरे; घरमालकाच्या मुलाला अटक

Delhi News | दिल्लीतील शक्करपूर येथे घृणास्पद प्रकार
Police arrested youth in  Shakkarpur
शक्करपूर येथे भाडेकरु तरुणीच्या बाथरुम-बेडरुममध्ये छुपे कॅमेरे लावल्याप्रकरणी घरमालकाच्या मुलाला अटक केली.File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महिला भाडेकरूच्या बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे बसवल्याच्या आरोपावरून दिल्लीतील शक्करपूर येथील ३० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी मंगळवारी (दि.२४) अटक केली. करण असे आरोपीचे नाव असून, तो महिला राहत असलेल्या घराच्या मालकाचा मुलगा आहे. तो त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहतो.

नागरी सेवा परीक्षेची तयारी करणारी पीडित मुलगी भाड्याच्या घरात एकटीच राहते. मुळची उत्तर प्रदेशातील असलेली पीडित मुलगी तिच्या गावी गेली होती. गावी जाताना तिने घराची चावी घरमालकाकडे दिली होती. तेव्हा हे छुपे कॅमेरे बसवण्यात आले. ती घरून परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. तपासादरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी करणच्या ताब्यातून रेकॉर्ड केलेले व्हिडिओ करण्यासाठी वापरलेला छुपा कॅमेरा आणि दोन लॅपटॉप जप्त केले.

पोलिस उपायुक्त अपूर्व गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, करणविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७७ अंतर्गत शक्करपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणीचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलींच्या वसतिगृहातील बाथरुममध्ये छुपा कॅमेरा आढळून आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर दिल्लीत ही घटना घडली आहे.

Police arrested youth in  Shakkarpur
केंद्र सरकार दिल्ली आणि मुंबईत ३५ रुपये किलोने कांदा विकणार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news