मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

Uttarakhand : नेमकं काय झालं?
Uttarakhand, Chief Election Commissioner Rajiv Kumar
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार.(File photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरचे आज उत्तराखंडच्या मुनस्यारी येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हे हेलिकॉप्टर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह उत्तराखंडचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय कुमार जोगदंड यांना मुनस्यारी येथे घेऊन जात होते. दरम्यान, या हेलिकॉप्टरचे पिथौरागढ जिल्ह्यात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती उत्तराखंड सरकारने दिली आहे.

खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग केल्याचे सांगण्यात आले आहे. दुपारी १.४० च्या सुमारास ही घटना घडली.

नेमकं काय झालं?

राजीव कुमार पिथौरागढ जिल्ह्यातील मिलम येथे जात होते. पण दुपारी दीड वाजता खराब हवामानामुळे रालम येथील एका शेतात हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी आयटीबीपी टीम रालमकडे रवाना झाली.

Uttarakhand, Chief Election Commissioner Rajiv Kumar
सात विमाने बॉम्बने उडवून देण्याची सोशल मीडियावरून धमकी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news