हरियाणा विधानसभा रणधुमाळीपूर्वी चौटालांच्या 'जजपा'ला झटका!

दहापैकी चार आमदारांनी दिला राजीनामा
Haryana Assembly Election 2024
दुष्यंत चौटालाFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हरियाणा विधानसभा निवडणूक जाहीर होताच पहिला झटका दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टी (जजपा)ला बसला आहे. त्यांच्या 10 पैकी चार आमदारांनी पक्ष सोडला आहे. यातील दोघे जण माजी मंत्री आहेत. ( Haryana Assembly Election 2024 )

चार आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

'जेजेपी'कडून 2019 मध्ये कैथलच्या गुहला राखीव विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या ईश्वर सिंह यांनीही पक्षाचा निरोप घेतला आहे. शाहबादचे आमदार रामकरण यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांत चार आमदारांनी पक्षाचा निरोप घेतला आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं ईश्वर सिंह आणि रामकरण यांनी म्हटलं आहे. ( Haryana Assembly Election 2024 )

कोण आहे देवेंद्र बबली?

देवेंद्र बबली हे फतेहाबाद जिल्ह्यातील टोहाना विधानसभा मतदारसंघातून जननायक जनता पक्षाचे आमदार आहेत. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये 52302 मतांनी विजय मिळवून देवेंद्र बबली पहिल्यांदाच आमदार झाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून सुमारे 39 हजार मते मिळवली होती. देवेंद्र सिंह बबली आझाद यांनी निवडणूक लढवल्यानंतर काँग्रेसकडे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे तिकीट न मिळाल्याने देवेंद्र सिंह बबली यांनी जेजेपीमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली होती.

माजी मंत्री अनूप धनक यांनीही दिला सर्व पदांचा राजीनामा दिला

उकलानाचे आमदार आणि माजी मंत्री अनुप धनक यांनी शुक्रवारी जननायक जनता पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्या आणि पदांचा राजीनामा दिला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत आमदार अनूप झनक यांनी ही घोषणा केली होती. त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अजयसिंह चौटाला यांच्याकडे पाठवला आहे. पक्षातील अत्यंत निष्ठावंत नेते अशी त्‍यांची ओळख होती. अनूप धनक भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांकडे ते जाण्याची शक्यता व्‍यक्‍त केली जात आहे. नारनौंदचे आमदार रामकुमार गौतम पक्षातील पहिले बंडखोर ठरले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी बरवालाचे आमदार जोगीराम सिहाग यांनी सर्व पक्षीय पदांचा राजीनामा दिला आणि भाजपचे उमेदवार चौधरी रणजित सिंह यांचा प्रचार केला होता.

हरियाणा 90 सदस्यीय विधानसभा निवडण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी मतदान करणार आहे, निवडणूक आयोगाने काल जाहीर केले. ४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news