
गुरूपौर्णिमा भौतिक प्रकृतीपलीकडे जाण्याच्या मानवी क्षमतेचा आणि आदियोगी, ज्यांमुळे हे शक्य झाले, त्यांचे माहात्म्य साजरे करणारा उत्सव आहे. कृपेस पात्र होण्यासाठी सर्वांत शुभ दिवस.
सद्गुरू
आदियोगी एक प्राचीन, धर्मांच्याही आधीच्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रतिनिधित्व करतात, जे आंतरिक कल्याणासाठी आहे.
सद्गुरू
योग संस्कृतीत आपण शिवाला देव म्हणून पाहत नाही. आमच्यासाठी, शिव हे आदियोगी आहेत - पहिले योगी आणि आदिगुरू - पहिले गुरू.
सद्गुरू
गुरूचं कार्य म्हणजे अशा अयमांवर प्रकाश टाकणं जे अद्याप तुमच्या अनुभवात नाहीत. तुमचं सांत्वन नाही, तर तुमचा विकास घडवून आणणं हाच गुरूचा मुख्य हेतू आहे.
सद्गुरू
गुरूची उपस्थिती आध्यात्मिक प्रक्रियेला सक्रिय करते, उंचावते आणि वेगवान करते.
सद्गुरू
आपण ज्याला शिव म्हणून संबोधतो ती अंतिम शक्यता खूप जिवंत आणि उपलब्ध आहे. ती नेहमीच होती.
सद्गुरू
त्यांनी योगाचे विज्ञान प्रदान केले - आत्म-परिवर्तनाची ही साधने जी लोकांवर बळजबरीने लादल्याने नाही तर नुसत्या त्यांच्यामुळे मिळणाऱ्या परिणामांमुळे टिकून आहेत.
सद्गुरू
आदियोगींनी निर्माण केलेली ज्ञानाची मूळ धारा, ही या पृथ्वीवरील, तुम्ही आध्यात्मिक म्हणू शकाल अशा जवळपास प्रत्येक गोष्टीचा उगम आहे.
सद्गुरू
आदियोगी भूतकाळाशी संबंधित नसून भविष्याशी संबंधित आहेत.
सद्गुरू
माझी इच्छा आहे की जगाला हे कळावं की योगाचे मूळ प्रवर्तक हे आदियोगी, शिव स्वतः आहेत.
सद्गुरू
माझी इच्छा आहे की तुम्हाला जीवनाचा खरा उद्देश आणि सामर्थ्य कळावं. या गुरुपौर्णिमेला माझी कृपा तुमच्यावर आहे.
सद्गुरू