

Man attends court from toilet Gujarat High Court Virtual hearing Court decorum Viral video
अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयात एका व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान घडलेला अजब प्रकार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती, न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान थेट टॉयलेट सीटवर बसलेला दिसत आहे. आणखी धक्कादायक म्हणजे, तो त्यावेळी स्वतःला साफ करतानाही कॅमेऱ्यात कैद झाला.
ही घटना 20 जून रोजी न्यायमूर्ती निझार एस. देसाई यांच्या खंडपीठासमोर घडली. व्हिडीओच्या सुरुवातीला 'सरमद बॅटरी' या नावाने लॉगिन केलेला व्यक्ती ब्लूटूथ इयरफोन घालून दिसतो.
थोड्या वेळाने त्याने आपला मोबाईल थोडा लांब ठेवला आणि त्यातून दिसून आले की तो प्रत्यक्षात टॉयलेटवर बसलेला आहे. त्यानंतर तो साफसफाई करून टॉयलेटमधून बाहेर पडतो आणि थोडा वेळ ऑफ-स्क्रीन राहत पुन्हा दुसऱ्या खोलीत दिसतो.
कोर्टाच्या नोंदीनुसार, संबंधित व्यक्ती हा एका FIR (प्रथम माहिती अहवाल) रद्द करण्याच्या प्रकरणात तक्रारदार होता. दोन्ही पक्षांमध्ये आपसी समेट झाल्याने न्यायालयाने FIR रद्द करण्याचे आदेश दिले.
त्याचे खरे नाव धवलभाई कणुभाई अंबालाल पटेल असून तो 42 वर्षांचा आहे. त्याने बी.एससी. पदवी घेतली असून रिलायन्स ग्रुपमध्ये नोकरी आहे
वडिलांच्या प्रकरणातील प्रतिस्पर्धी/प्रतिवादी म्हणून व्हर्च्युअल सुनावणीत तो सहभागी झाला होता. पहिल्यांदा 17 फेब्रुवारी, 2025 रोजी तो झूमवर लॉगिन झाला, परंतु तो टॉयलेटमधून असल्याचे लक्षात आले; प्रशासनाने त्याचा व्हिडीओ कापला. दुसऱ्यांदा त्याने पुन्हा तोच नंबर वापरून लॉगिन केले; परंतु पुन्हा त्याची व्हिडिओ लिंक कापण्यात आली.
न्यायालयाने त्याला 200000 रुपये दंड ठोठावला. त्यातील 50000 रुपये एका पालडीतल्या अनाथालयात दान देण्याचा आदेश देण्यात आला आहे. उर्वरित रक्कम गुजरात हायकोर्ट लीग एड सर्व्हिसेस कमिटीमध्ये जमा केली जाणार आहे.
याशिवाय न्यायालयाने त्याला 2 आठवडे सामुदायिक सेवा करायला सांगितले आहे. दररोज 8 तास कोर्टाच्या बागांमध्ये स्वच्छता व पाणी पुरवठा करण्याची शिक्षा त्याला सुनावली आहे.
कोर्टाचे म्हणणे होते की “जर अशा प्रकारे व्यक्तीवर कठोर कारवाई केली नाही, तर न्यायव्यवस्थेची गरिमा जनतेसमोर कमी होईल.” न्यायमूर्ती एम. के. ठक्कर यांनी न्यायालह हे सिनेमागृह नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.
ऑनलाईन माध्यमातून चालणाऱ्या न्यायालयीन कार्यवाहीतही शिस्तीचे पालन अत्यावश्यक आहे. न्यायालयात हजेरी लावणे म्हणजे एक गंभीर जबाबदारी आहे.
ऑनलाईनचा अर्थ घरगुती वातावरणात काहीही करता येते असा गैरसमज अनेकदा अशा घटनांमुळे समोर येतो. अशा कृतींमुळे केवळ संबंधित व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण न्यायप्रक्रियेची शिष्टता धुळीला मिळते.
गुजरात उच्च न्यायालयात ऑनलाईन सुनावणीदरम्यान होणारे अशोभनीय प्रकार याआधीही घडले आहेत.
एप्रिल 2025 मध्ये, विस्वा वर्सानी नावाच्या व्यक्तीला वर्च्युअल सुनावणीत सिगारेट ओढल्यासाठी 50000 रुपये दंड ठोठावण्यात आला होता.
फेब्रुवारी 2025 मध्ये वामदेव गाधवी नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने पलंगावर झोपून सुनावणीत भाग घेतला होता. त्यालाही 25000 रुपये दंड ठोठावण्यात आला होता.