विमा शुल्कावरील जीएसटी होणार रद्द; केंद्राचा प्रस्ताव विमाधारकांना मिळणार मोठा दिलासा

GST on insurance charges to be abolished
विमा शुल्कावरील जीएसटी होणार रद्द; केंद्राचा प्रस्ताव विमाधारकांना मिळणार मोठा दिलासाFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : विमा शुल्क रकमेवर भरावा लागणारा वस्तू आणि सेवा कर (जीएस) 18 टक्क्यांवरून 5 टक्के अथवा शून्य करण्याचा विचार सरकार करत आहे. अगामी जीएसटी 2.0 मध्ये हे बदल केले जातील. त्यामुळे विमाधारकांना दिलासा मिळणार आहे.

विमा शुल्कावरील जीएसटी रद्द करण्याबरोबर सरकार जीएसटी कर रचनेत आमूलाग्र बदल करणार आहे. नव्या कररचनेत 5 आणि 18 टक्क्यांची प्रमुख कर श्रेणी राहतील. तर 40 टक्क्यांची नवीन कर श्रेणी केली जाणार आहे. त्यात मद्य, तंबाखू आणि लक्झरी वस्तूंचा समावेश केला जाणार आहे. खाद्यान्न, औषधे, वैद्यकीय उपकरणे, स्टेशनरी, शैक्षणिक साहित्य आणि केसांना लावण्याचे तेल, टूथब्रश यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर एक तर हटवला जाईल, अथवा या वस्तू 5 टक्के कर श्रेणीत येतील.

टीव्ही, एअरकंडिशनर आणि फ्रीज यांसारख्या वस्तू 18 टक्के कर श्रेणीत येतील. वाहने, हातमागाच्या वस्तू, शेतमाल, कापड, खते आणि हरित ऊर्जेवर आधारित उत्पादनांवर नवीन कर रचनेत विशेष लक्ष दिले जाणार आहे. खारे पदार्थ, पराठाज, बन आणि केक यांवरील कर श्रेणी सुटसुटीत केली जाणार आहे. हिरे आणि मौल्यवान खड्यांवर 0.25 टक्के आणि ज्वेलरीवर 3 टक्के कर लागू राहील. सराफी उद्योगाला त्यामुळे दिलासा मिळणार आहे. रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news