

नवी दिल्ली : विरोधकांना वाटते की सभागृहाचे कामकाज चालावे मात्र सरकारलाच तसे वाटत नाही, ही परिस्थिती पहिल्यांदाच पाहत आहे. अशी टीका काँग्रेस खासदार प्रियंका गांधींनी केंद्र सरकारवर केली.
प्रियंका गांधी मंगळवारी संसदेत 'एक देश एक निवडणूक' यासंबंधी संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीला उपस्थित होत्या. ही बैठक आटोपल्यानंतर परत जात असताना त्यांनी सरकारच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृह चालवणे ही सरकारची जबाबदारी आहे, मात्र सरकारच यातून पळ काढत आहे. मी अनेक वर्षे सभागृहाचे कामकाज पाहते. आता प्रत्यक्ष सभागृहातून ते पाहते आहे. यामध्ये सरकारलाच वाटत नाही की सभागृह चालावे आणि हे पहिल्यांदा निदर्शनास येत आहे, असेही त्या म्हणाल्या.