Parliament session | महिला आरक्षण, परिसीमन विधेयक मंजूर करून घेणार

सर्वच पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न
Parliament session |
Parliament session | महिला आरक्षण, परिसीमन विधेयक मंजूर करून घेणार
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा टप्पा बोलावण्याची घोषणा गुरुवारी (दि. २६) केली. चार दिवसांच्या या अधिवेशनाची सुरुवात सोमवार, ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेच्या कामकाजाने होईल.

२ डिसेंबर रोजी राज्यसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले आहे. ३ डिसेंबर रोजी या अधिवेशनाची सांगता होईल. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ही माहिती दिली. या अधिवेशनातच महिला आरक्षण व परिसीमन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक मंजूर करून घेतले जाणार आहे. केंद्र सरकारने तसा चंग बांधला आहे. सरकारने अधिवेशनाचा अधिकृत अजेंडा अद्याप जाहीर केला नसला, तरी अधिवेशन बोलावण्याच्या पद्धतीवरून सरकारने घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याची तयारी केल्याचे स्पष्ट होते.

हे १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक असेल. ते गोंधळात मंजूर करून घेता येणार नाही; यासाठी सरकारला दोनतृतीयांश बहुमताची आवश्यकता असेल. विशेष म्हणजे, परिसीमनदरम्यान लोकसभा किंवा विधानसभेच्या कमाल जागांची मर्यादा वाढवायची असल्यास (उदा., २०२६ मध्ये प्रस्तावित कमाल ८५० जागांची मर्यादा), राज्यांतील जागावाटपावरील घटनात्मक बंदी किंवा कालमर्यादा बदलायची असल्यास किंवा इतर घटनात्मक तरतुदींत सुधारणा करायची असल्यास घटनादुरुस्ती विधेयक (कलम ३६८ अंतर्गत विशेष बहुमताने) आवश्यक असते.

काँग्रेसची आज तातडीची बैठक

रिजिजू यांच्या घोषणेनंतर काँग्रेसने या विषयावर शुक्रवारी (दि. २७) तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खा. प्रियांका गांधी यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार मनीष तिवारी यांनी सरकारच्या निर्णयावर टीका करताना म्हणाले, ‘ही वेळ संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्याची आहे. विशेष अधिवेशन ही दोन अधिवेशनांच्या मधल्या काळात बैठक बोलावली जाते. ती नियमित हिवाळी अधिवेशनाला पर्याय बनू शकत नाही आणि बनूही नये. नियमित हिवाळी अधिवेशन का बोलावले जात नाही? सरकारची इच्छा असेल, तर फेटाळलेली विधेयके ते पुन्हा मांडू शकते.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.