

goa man identified his clogs in lots of footwear in front of temple chatgpt
पुढारी ऑनलाईन : ChatGPT ने शोधून दिली चप्पल: मंदिरात दर्शन घेऊन परतल्यानंतर आपले बूट किंवा चप्पल सापडत नसेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. एकदा AIची मदत घेऊन पाहा. एका व्यक्तीने असेच केले आणि आता त्याची ही ट्रिक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भविष्यात अनेकजण ही पद्धत नक्कीच आजमावतील.
मंदिराबाहेर 1000 पेक्षा जास्त बूट-चप्पल असतील, तर त्यामधून आपली चप्पल शोधण्यासाठी तासन्तास लागू शकतात. कदाचित कंटाळून तुम्ही चप्पल तिथेच सोडूनही जाल. मात्र, एका व्यक्तीने असे केले नाही. त्याने अवघ्या काही मिनिटांत आपले बूट शोधून काढले. आता सोशल मीडियावर त्याच्या कल्पकतेसोबतच AIचेही कौतुक होत आहे. या कामात त्याचा साथीदार ठरला ChatGPT. पण हे सगळं नेमकं कसं घडलं, हे व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
Shubhang Borkar यांनी बनवला व्हिडिओ
Shubhang Borkar यांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला उज्जैनच्या महाकाल मंदिराबाहेर असंख्य बूट-चप्पल दिसतात. मात्र, त्यामधून शुभांग यांचे बूट कोणते हे ओळखणे कठीण होते. त्यांनी व्हिडिओवर मजकूर लिहिला आहे, “माझे बूट शोधण्यासाठी मी ChatGPTचा वापर केला.”
स्वतः शोधायचे असते तर...
या बुटांच्या ढिगाऱ्यातून आपले बूट शोधणे अजिबात सोपे नव्हते. एक-एक करून बूट तपासत गेले असते, तर त्यांना स्वतःचे बूट शोधण्यासाठी तास लागले असते. मात्र, AIने असे काही करून दाखवले, ज्याचा कदाचित शुभांग यांनीही विचार केला नसेल. त्यांनी बुटांच्या ढिगाऱ्याचा आणि स्वतःच्या बुटांचा फोटो AIला पाठवला आणि कमाल झाली.
संपूर्ण माहिती दिली आणि काम झाले
शुभांग यांनी AIला संपूर्ण परिस्थिती सांगितली होती. ते उज्जैनला गेले होते आणि मंदिराबाहेर असलेल्या बूट-चप्पलांच्या मोठ्या ढिगाऱ्यातून आपले बूट शोधणे त्यांच्यासाठी कठीण झाले होते. त्यानंतर AIने त्यांना काही प्रश्न विचारले आणि शेवटी त्यांचे बूट शोधून काढले. याचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे.
AI हेही करू शकते!
हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. AIचा अशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो, याचा अनेकांनी विचारही केला नव्हता. एका यूजरने मजेशीर प्रतिक्रिया देताना लिहिले, “AI विचार करत असेल, हे लोक माझा कशासाठी वापर करत आहेत? आता मला माझं डोकं लावावं लागेल.” तर आणखी एका यूजरने लिहिले, “AI कोपऱ्यात उभं राहून रडत असेल!”