

जैविक अस्त्रे अत्यंत घातक आहेत. ती केवळ लष्करीच नव्हे, तर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय स्तरावरही विनाश घडवू शकतात. भविष्यात जैविक अस्त्रे मानवतेला कधीही संकटात टाकू नयेत, यासाठी जगाला एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जगाला याच धोक्याबद्दल सावध केले आहे.
सूक्ष्मजीवांचा वापर
पारंपरिक शस्त्रे, रासायनिक वायू, अणुबॉम्ब आणि सायबर हल्ले. याच भयावह शस्त्रांच्या श्रेणीत आणखी एका नावाची भर पडते, ते म्हणजे जैविक अस्त्रे. सूक्ष्मजीवांचा वापर युद्धाचे शस्त्र म्हणून केला जाण्याचा संभाव्य धोकाही निर्माण केला आहे.
लाखो लोक प्रभावित
जैविक अस्त्रांचा वापर मानव जातीसाठी इतका विनाशकारी ठरू शकतो की, त्यामुळे लाखो लोक प्रभावित होऊ शकतात. विशेष म्हणजे, यात कोणताही स्फोट होत नाही.
जैविक अस्त्रांचा इतिहास
जैविक अस्त्रांचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. पूर्वीच्या काळी संक्रमित प्राणी किंवा मृतदेहांचा वापर शत्रूच्या प्रदेशात संसर्ग पसरवण्यासाठी केला जात असे.
1972 साली करार
1972 मध्ये जैविक अस्त्र करार अस्तित्वात आला, ज्याने जैविक अस्त्रांचा विकास, साठा आणि वापरावर बंदी घातली.
जैविक अस्त्रापासून बचाव शक्य आहे का?
जैविक अस्त्रापासून बचावासाठी जागतिक देखरेख प्रणाली मजबूत करणे हे पहिले पाऊल आहे. देशाची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करावी लागेल, जेणेकरून कोणत्याही संशयास्पद साथीचा त्वरित शोध घेता येईल.
संपूर्ण परिसंस्थेला हानी
जैविक अस्त्रे म्हणजे अशी शस्त्रे ज्यात जीवाणू, विषाणू , बुरशी किंवा जैविक विष यांचा वापर मानव, प्राणी, वनस्पती किंवा संपूर्ण परिसंस्थेला हानी पोहोचवण्यासाठी केला जातो. यामध्ये अँथ्रॅक्स, देवीचे विषाणू, प्लेग, बोटुलिनम टॉक्सिन, व्हायरल हेमरेजिक फिव्हर विषाणू किंवा त्यांचे कोणतेही हायब्रीड स्वरूप असू शकते.
अमेरिका : दुसर्या महायुद्धानंतर अमेरिकेने जैविक अस्त्र कार्यक्रमांवर भर दिला होता. 1969-70 मध्ये अध्यक्ष निक्सन यांनी तो अधिकृतपणे बंद केला. अमेरिका आता केवळ ‘संरक्षणात्मक संशोधन’ करते, ज्याला अंतर्गत परवानगी आहे.
जपान : जपानच्या युनिट 731 ने दुसर्या महायुद्धात प्लेग, अँथ्रॅक्स, कॉलरा इत्यादींचा युद्धात वापर केला होता.
उत्तर कोरिया : काही आंतरराष्ट्रीय अहवालांमध्ये उत्तर कोरियावर सक्रिय जैविक तयारी ठेवल्याचे आरोप आहेत; परंतु याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
सीरिया आणि चीन : सीरियावर रासायनिक शस्त्रांसह जैविक क्षमता विकसित केल्याचा संशय आहे. चीनचा तो सदस्य आहे; परंतु पाश्चात्त्य गुप्तचर संस्थांकडून त्यांच्या दुहेरी वापर संशोधनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात; मात्र ठोस पुरावे नाहीत.