Ambulance Rape Case | होमगार्ड भरतीदरम्यान बेशुद्ध युवतीवर रुग्णवाहिकेतच बलात्कार

रुग्णवाहिका चालक आणि तंत्रज्ञाला अटक
girl raped in ambulance during homeguard recruitment
Ambulance Rape Case | होमगार्ड भरतीदरम्यान बेशुद्ध युवतीवर रुग्णवाहिकेतच बलात्कारFile Photo
Published on
Updated on

गया (बिहार); वृत्तसंस्था : बिहारमधील गया येथे होमगार्ड भरती प्रक्रियेदरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. धावण्याच्या शर्यतीत बेशुद्ध पडलेल्या एका महिला उमेदवाराला रुग्णालयात नेत असताना मदतीसाठी आलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाने आणि तंत्रज्ञाने तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

ही घटना 24 जुलै रोजी बोधगया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीएमपी-3 परेड मैदानावर घडली. होमगार्ड भरतीसाठी आयोजित धावण्याच्या स्पर्धेत पीडित महिला उमेदवार चक्कर येऊन पडली. तिला तातडीने उपचारासाठी मैदानावर तैनात असलेल्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात येत होते; मात्र याच संधीचा फायदा घेत रुग्णवाहिका चालक विनय कुमार आणि तंत्रज्ञ अजित कुमार यांनी तिच्यावर अत्याचार केला.

पीडित महिलेने धाडस दाखवत घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस अधीक्षक आनंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासांत दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणाच्या तपासासाठी बोधगयाचे एसडीपीओ सौरभ जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात आली. बोधगया पोलीस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून, तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणाचा तपास लवकरच पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news