Varanasi Viral Video Row | संतापजनक..! गंगेच्या पात्रात 'नॉनव्हेज इफ्तार पार्टी'! नदीत कचरा फेकणार्‍यासह १४ अटकेत

Varanasi Viral Video Row : वाराणसी शहरात खळबळ, पोलिसांची मदनुपरा भागात कारवाई
Varanasi Viral Video Row
सोशल मीडियावर व्‍हायरल होणार्‍या एका व्हिडिओमध्ये १५-२० मुस्लिम तरुण गंगा नदीत एका नौकेत बसून 'इफ्तार' करताना दिसत आहेत.
Published on
Updated on

Varanasi Viral Video Row

वाराणसी: सोशल मीडियावर व्‍हायरल होणार्‍या एका व्हिडिओमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये १५-२० मुस्लिम तरुण गंगा नदीत एका नौकेत बसून 'इफ्तार' करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप घेत वाराणसीतील कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून मदनपुरा भागातील १४ तरुणांना अटक केली आहे.

व्‍हिडिओची शहरात जोरदार चर्चा

मंगळवारी समोर आलेल्या या व्हिडिओची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. व्हिडिओमध्ये अंदाजे १५ ते २० रोजेदार गंगेच्या पात्रात एका नौकेवर बसून इफ्तार करत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ बनवणारा तरुण नौकेवर ठेवलेल्या खाद्यपदार्थांकडे कॅमेरा फिरवतो, ज्यात एका बाजूला बिर्याणी देखील ठेवलेली दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला असून, "गंगा केवळ नदी नसून ती आमची माता आहे," अशी भूमिका मांडली आहे.

Varanasi Viral Video Row
Lawrence Bishnoi Reels Trap | लॉरेन्स बिश्नोई गँगने रचला 'रील्स'चा सापळा! तरुणांना टोळीत सामील करण्यासाठी नवा फंडा!

१५ मार्च रोजी अपलोड झाला होता व्हिडिओ

या घटनेची माहिती देताना वाराणसी एसीपी कोतवालीचे एसीपी विजय प्रताप यांनी सांगितले की, भाजप युवा मोर्चाशी संबंधित रजत जयस्वाल यांनी या व्हिडिओबाबत तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारे तरुण नौकेत बसून चिकन बिर्याणी खात आहेत आणि त्यानंतर त्याचे अवशेष गंगा नदीत फेकत आहेत. तपासात असे निष्पन्न झाले की, हा व्हिडिओ १५ मार्च रोजी सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता.

Varanasi Viral Video Row
Viral Video: सुसाट मर्सिडीज, बोनेटवर ट्रॅफिक पोलीस आणि १ किलोमीटरचा मृत्यूचा प्रवास; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ!

अटक केलेल्यांवर कोणती कारवाई?

एसीपी विजय प्रताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये व्हिडिओ अपलोड करणाऱ्या तहसीमचाही समावेश आहे. हे सर्व तरुण वाराणसीच्या मदनपुरा भागातील रहिवासी आहेत. पोलीस व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या इतर व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. या सर्वांवर बीएनएस (BNS) च्या कलम २९८, २९९, २९६(1B), २७० आणि २७९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news