

पुढारी ऑनलाईन डेस्क
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलेली एक पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. त्यांनी एका व्हॅनिटी व्हॅनचा व्हिडीओ शेअर केला आहे. आशिलान असलेल्या व्हॅनची टूर एक व्यक्ति करत आहे. या व्हिडिओला त्यांनी (That’s not transport. It’s prime real estate…)‘ दॅटस् नॉट ट्रान्सपोर्ट, इटस् प्राईम रिअल इस्टेट’ अशी कॅप्शन दिली आहे.
भविष्यात लोक जर वाहनांमध्ये राहू लागले तर कशा पद्धतीची घरे असू याची झलक या व्हिडिओतून दिसून येते. BRABUS Motorhome या कंपनीच्या बसचा हा व्हिडीओ आहे. BRABUS BIG BOY 1200 या कंपनीने नवीनच लॉन्च केलेल्या बसचा हा व्हिडीओ आहे.
या वाहनामध्ये अत्यंत लक्झुरिअस सुविधा आहेत. या बसमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमच्या बुटांना कव्हर घालावे लागतात. येथून पूढे या बसची मिनी टूर सुरु होते. सुरवातीलाचा एक आरामदायी सोफा कम डायनिंग टेबल दिसतो त्यानंतर लगेच ड्रायव्हरसिट दिसते त्याच्या बाजूलाच एक सोफा जोडलेला दिसतो. सोफ्याच्या बाजूलाच किचन आहे.
दरवज्याच्या डाव्या बाजूला गेल्यावर एक वॉशरूम व बाथरुम दिसून येथे त्याच्या बाजूलाच एक वॉशबेसीन आहे. तिथुन पुढे गेल्यावर डबल बेड दिसून येतो. या बसची इंटेरिअर अल्ट्रा लक्झुरीअस असल्याचे दिसून येते. एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधील सर्व सुविधा या बसमध्ये दिसून येते. महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या बस टूरच्या व्हिडीओला लाखो व्हिव्यू मिळाले आहेत अल्पावधीतच हे टि्वट व्हायरल झाले आहे.
या बसविषयी आणखी माहिती म्हणजे ही ब्राबस मोटरहोम या कंपनीची ही बस असून ही कंपनी अशा लक्झरी कॅराव्हॅन तयार करत असते. या कंपनीच्या वेबसाईटवर याची माहिती दिली आहे. या बसची लांबी १२ मिटर असून यामध्ये ३२० स्क्वेअर फुट इतकी जागा यामध्ये दिली आहे. तसेच या बसच्या दोन्ही बाजू वाढवता येतात. बेडरुम व किचन रुम सरकवून याची रुंदी १४ फुट करता येते. बेडच्या समोर ४३ इंची टिव्ही जोडला आहे हा टिव्ही स्टारलिंकच्या इंटरनेटशी जोडला आहे. तसेच दरवाजे व इतर सुविधा इलेक्ट्रीकली ऑपरेट होतात. यामध्ये पंचतारांकीत सुविधा दिल्या आहेत.