नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
हजारो कोटींच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी ) घोटाळ्यातील आरोप व हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सी एंटिग्वा येथून गायब झाला आहे. याबाबतची माहिती त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी दिली आहे. स्थानिक पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, चोक्सी हा क्युबा येथे पसार झाला असावा, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.
२०१८ मध्ये १३ हजार कोटींच्या पीएनबी घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी होण्यापूर्वी मेहुल चोक्सी एंटिग्वामध्ये पळाला. त्याने २०१७मध्येच एंटिग्वा आणि बारबुडाच नागरिकत्व घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. आता येथूनही तो गायब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. चोक्सी हा सोमवारी रात्री एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. यानंतर तो बेपत्ता झाला आहे. त्याच्या वास्तव्याबाबत कुटुंबीयांना माहिती नाही. ते चिंतेत आहेत, असा दावा त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी केला आहे.
वाचा : 'प्रियांका चोप्रा, कंगनाला भेटणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटण्यास वेळ का नाही?'
एंटिग्वामधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली. आहे. चोक्सी त्याची कार सोमवारी रात्री जॉली हार्बरमध्ये सापडली. मात्र अद्याप त्याच्या ठावठिकाणा मिळालेला नाही. याबाबत स्थानिक पोलिसांनी अधिकृत घोषणा केलेले नाही. दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी मेहुल चोक्सी याने क्युबा येथे आश्रय घेतला असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे.