Vadodara Bridge Collapse : वडोदर्‍यातील महिसागर नदीवरील पूल कोसळला, ९ ठार

Gambhira Bridge: दोन ट्रक, दोन पिकअपसह रिक्षा नदी पात्रात कोसळली
gambhira bridge
vadodara
gambhira bridge vadodaraANI
Published on
Updated on

Gambhira Vadodara Bridge Collapse News

वडोदरा :गुजरातमधील वडोदरा जिल्ह्याला आणंदशी जोडणारा नदीवरील पूल कोसळला आहे. आज सकाळी झालेल्‍या दुर्घटनेमुळे अनेक वाहने नदीत काेसळली. पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना वाचवले आहे. बचाव कार्य सुरू आहे.

दोन ट्रक, दोन पिकअपसह रिक्षा नदी पात्रात कोसळली, ९ ठार

गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील गंभीरा पूल हा मध्य गुजरातमधील महत्त्वाच्या पुलांपैकी एक आहे. तो मध्य गुजरातला सौराष्ट्रशी जोडतो. आज सकाळी साडेसातच्‍या सुमारास एक भाग कोसळला. या दुर्घटनेबाबत ANIशी बोलताना वडोदराचे पोलीस अधीक्षक रोहन आनंद यांनी सांगितले की, "पुलाच्या मध्यभागी १०-१५ मीटरचा स्लॅब कोसळला. पुलावर दोन वाहने अडकली. दोन ट्रक, दोन पिकअप आणि एक रिक्षा खाली नदी पात्रात कोसळले. यामध्‍ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ९ जणांना वाचवण्यात आले आहे. बचाव कार्य अजूनही सुरू आहे."

gambhira bridge
vadodara
Eknath Shinde : ‘ जय गुजरात’ च्या वादावर एकनाथ शिंदेचे प्रत्‍यूत्तर : उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट

घटनेनंतर व्‍हायरल झालेल्‍या व्हिडिओमध्ये गंभीरा नदीवर बांधलेल्या पुलाचा मोठा भाग कोसळल्याचे दिसून येते. त्यावर एक टँकर लटकलेला दिसत आहे. पुलाच्या दुसऱ्या बाजूला एक दुचाकी लटकलेली दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूल कोसळल्याने एक ट्रक, दोन कारसह अनेक वाहने नदीत पडली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news