

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : खातेधारकांनो, तुमची बँकेची काही महत्त्वाची कामे असतील तर ती शुक्रवारी (दि. ११) लवकरात लवकर उरका. कारण, गुरुवार (दि. १०) ते सोमवार (दि. १४) या पाच दिवसांत चार दिवस बँका बंद राहणार आहेत. गुरुवारी (दि. १०) महावीर जयंती, दि. १२ रोजी दुसरा शनिवार, दि. १३ रोजी रविवार, तर सोमवारी (दि. १४) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. या पाच दिवसांच्या काळात केवळ शुक्रवारी (दि. ११) एक दिवस बँका सुरू राहतील.