राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यन यांची नियुक्ती

National Human Rights Commission | केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नियुक्तीची घोषणा
National Human Rights Commission
Image Source X
Published on
Updated on

नवी दिल्लीः राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (एनएचआरसी) अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. रामसुब्रमण्यन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नियुक्तीची घोषणा सोमवारी, केली. माजी न्यायमूर्ती रामसुब्रमण्यन जून २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आहेत.

अरुण कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ संपल्यावर १ जून २०२४ पासून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. यानंतर एनएचआरसीच्या सदस्या विजया भारती सयानी या आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाचीही अध्यक्षपदासाठी चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी या चर्चा नाकारत विराम दिला होता.

माजी न्यायमूर्ती रामसुब्रमण्यन यांचा जन्म ३० जून १९५८ रोजी झाला आहे. त्यांनी रामकृष्ण मिशनच्या विवेकानंद कॉलेज, चेन्नई येथून रसायनशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर मद्रास लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात सुमारे २३ वर्षे वकिली केली. ३१ जुलै २००६ रोजी त्यांची मद्रास उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून आणि ९ नोव्हेंबर २००९ रोजी कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०१६ पासून हैदराबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०१९ मध्ये त्यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २३ सप्टेंबर २०१९ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि जून २०२३ मध्ये ते निवृत्त झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news