

Dhananjay Chandrachud
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आता विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे देणार आहेत. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली (एनएलयू) ने त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली आहे. एनएलयू दिल्ली माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वात संविधान अभ्यास केंद्र सुरु करणार आहे.
एनएलयू दिल्लीचे कुलगुरू, जी.एस. बाजपेयी म्हणाले की, न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. भारतीय कायद्याच्या शिक्षण क्षेत्रातील एक परिवर्तनकारी अध्याय आहे. भावी पिढ्यांना घडवण्यासाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे, असे ते म्हणाले. एनएलयू "इन द स्पिरिट ऑफ जस्टिस: द डीवायसी डिस्टिंग्विश्ड लेक्चर सिरीज" जुलै २०२५ पासून सुरु करणार आहे. यामध्ये माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.