Dhanendra Kumar | ‘सीसीआय’चे माजी प्रमुख धनेंद्र कुमार यांचा आगीत मृत्यू

Dhanendra Kumar |
Dhanendra Kumar | ‘सीसीआय’चे माजी प्रमुख धनेंद्र कुमार यांचा आगीत मृत्यू
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : येत्या 6 जून रोजी असणारा 80 वा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने 30 मे रोजी होणार्‍या कौटुंबीक सोहळ्याची तयारी सुरू असतानाच, भारतीय स्पर्धा आयोगाचे (सीसीआय) पहिले अध्यक्ष आणि माजी सनदी अधिकारी धनेंद्र कुमार यांचे दक्षिण दिल्लीतील राहत्या घराला लागलेल्या भीषण आगीत निधन झाले.

या दुर्दैवी घटनेत, वडिलांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी खास लंडनहून भारतात आलेला त्यांचा मुलगाही गंभीररित्या होरपळला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हरियाणा कॅडरचे 1968 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी असलेले धनेंद्र कुमार यांनी जागतिक बँकेत (वर्ल्ड बँक) भारताचे प्रतिनिधित्व करताना कार्यकारी संचालक म्हणूनही काम पाहिले होते. बुधवार रात्री उशिरा दक्षिण दिल्लीतील हौझ खास एन्क्लेव्ह येथील त्यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीच्या प्रचंड धुरामुळे श्वास गुदमरल्याने धनेंद्र कुमार यांचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news