Vikram Misri Trolled: शस्त्रसंधीमुळे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांसह त्यांच्या मुलीला केले गेले ट्रोल

Vikram Misri Trolled: IAS, IRS, IRTS असोसिएशन मात्र मिसरींच्या पाठिशी; सीझफायरला अधिकारी नव्हे सरकार कारणीभूत - राजकीय नेत्यांची टीका
Foreign Secretary Vikram Misri
Foreign Secretary Vikram Misri
Published on
Updated on

Foreign Secretary Vikram Misri Trolled

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी करारावरुन विक्रम मिसरी यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका झाली. त्यांच्यासह त्यांच्या मुलगीलादेखील ट्रोल केले गेले. तथापि, विविध सिव्हिल सेवा संघटना तसेच राजकीय नेत्यांकडून मात्र मिसरी यांना पाठिंबा दिला गेला.

उलट राजकीय पक्षांकडून शस्त्रसंधीची जबाबदारी अधिकाऱ्यांची नसून सरकारची असल्याचे म्हणत भाजप सरकारवर टीका केली. आयएएस, आयआरटीएस, आयआरएस या संघटनांनी मिसरी यांना पाठिंबा दर्शवत शिष्टाचार राखण्याचे आवाहन केले आहे.

आयएएस संघटनेने काय म्हटले आहे?

आयएएस संघटनेने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आयएएस संघटना विक्रम मिसरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. सिव्हिल सेवा अधिकारी त्यांची कर्तव्ये इमानदारीने पार करत असताना त्यांच्यावर होणारे अनावश्यक वैयक्तिक हल्ले खेदजनक आहेत. आम्ही सार्वजनिक सेवेसाठी आदर आणि प्रतिष्ठा राखण्याचे ठाम वचन देतो."

Foreign Secretary Vikram Misri
Operation Sindoor: पाकचे मिराज विमान पाडले; भारतीय हवाईदलाने 150 किलोमीटर आत घुसून हल्ला केल्याचे स्पष्ट

आयआरटीएस, आयआरएस संघटनेचाही पाठिंबा

आयआरटीएस संघटना आणि आयआरएस (सीअँडआयटी) संघटनेने देखील मिसरी आणि त्यांच्या कुटुंबावरील दुराभिमानी टीकेची निंदा केली आणि आदर आणि शिष्टाचार राखण्याचे आवाहन केले.

"आयआरटीएस संघटना विक्रम मिसरी आणि त्यांच्या कुटुंबावरील अनावश्यक शिवराळ भाषा आणि वैयक्तिक हल्ल्यांची कडवट निंदा करते.

त्यांची देशासाठी समर्पित सेवा आणि महत्वाचे योगदान लक्षात घेऊन आम्ही सर्वांना आदर आणि शिष्टाचार राखण्याचे आवाहन करतो." असे आयआरटीएस संघटनेने पोस्ट केले.

"आयआरएस (सीअँडआयटी) संघटनेने परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि त्यांच्या कुटुंबावरील दोषारोपांवरून निषेध केला आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आणि सार्वजनिक सेवेबाबत दृढ प्रतिष्ठा राखण्याचे आम्ही ठरवले आहे," असे आयआरएस संघटनेने सांगितले.

Foreign Secretary Vikram Misri
Operation Sindoor: पाकिस्तानचे अणुस्थळ किराणा हिल्सवर भारतीय हवाईदलाने खरंच हल्ला केला? काय म्हणाले एअर मार्शल ए. के. भारती?

भाजपने मौन का पाळले आहे - अखिलेश यादव

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मिसरी यांना पाठिंबा देत असे वैयक्तिक हल्ले समर्पित अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करतात, असे सांगत त्यांनी भाजप सरकारवर या प्रकरणावर मौन पाळण्याचा आरोप केला आणि त्या अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे सांगितले.

"निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारची आहे त्या अधिकाऱ्यांची नाही. काही आपत्तीजनक घटक खुलेपणाने त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबावर अभद्र भाषा वापरत आहेत, पण भाजप सरकार किंवा त्याचे मंत्री त्यांची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी पुढे येत नाहीत किंवा अशा पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची चर्चा करत नाहीत," असे अखिलेश यादव यांनी X वर लिहिले आहे.

Foreign Secretary Vikram Misri
पाकिस्तानच्या पापाचा घडा भरला होता...; म्हणूनच राबविले 'ऑपरेशन सिंदूर'

मिसरींवर राजकीय निर्णयाचे आरोप करू नका - खा. ओवैसी

एमआयएमचे प्रमुख असदुद्दिन ओवैसी यांनी देखील मिसरी यांच्या बाजूने उभे राहून त्यांना पाठिंबा दिला.

"विक्रम मिसरी हे एक सभ्य, प्रामाणिक, कष्टाळू मुत्सद्दी आहेत. जे देश सेवेसाठी अथक परिश्रम घेत आहेत. आपल्या सिव्हिल सेवकांना कार्यकारी आदेशांच्या अधीन काम करणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे आणि त्यांना कोणत्याही राजकीय नेतृत्वामुळे घेतलेल्या निर्णयांवर दोषारोप करू नये," असे ओवैसी यांनी X वर म्हटले आहे.

शस्त्रसंधी

भारत आणि पाकिस्तान यांनी सर्व भूसुरक्षा, आकाश आणि समुद्रामध्ये सैन्याच्या कारवायांचे थांबवण्यासाठी एक समझोता केला. या घोषणेच्या अनुषंगाने मिस्री यांनी शस्त्रसंधीच्या निर्णयाची माहिती दिली होती आणि त्याआधी भारतीय आणि पाकिस्तानी सैन्य प्रमुखांमध्ये संवाद झाला होता. त्यानुसार 12 मे रोजी पुढील चर्चा ठरवण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news