पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रयागराजमध्ये पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आजपासून (दि.13) महाकुंभमेळ्यास (Mahakumbh Mela 2025) प्रारंभ झाला आहे. पौष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पहिले पवित्र स्नानाचा योग भविकांनी साधला. दुसरे शाही स्नान मकर संक्रांतदिनी (दि. 14) होणार आहे. रोज दोन कोटींहून अधिक भाविक महाकुंभला भेट देण्याची शक्यता आहे. यामध्ये विदेशी भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. जगभरातील भाविक उत्तर प्रदेशातील महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी भारतात येत असून, काही विदेशी भाविकांनी महाकुंभमेळ्याबाबतच्या प्रतिक्रिया वृत्तसंस्था 'एएनआय'शी बोलताना व्यक्त केल्या.
युरोपमध्ये वास्तव्यास असणार्या एका रशियन भाविकाने सांगितले की, "आम्ही प्रथमच पहिल्यांदाच कुंभमेळ्यात आलो आहोत. येथे खरा भारत आणि त्याची खरी शक्ती असणारे लोक आहेत. प्रयागराजमधील पवित्र स्नानाचा अनुभव हामाझ्यासाठी एक आध्यात्मिक उन्नती देणार आहे. मला भारत आवडतो, मेरा भारत महान!" जेरेमी म्हणाला की "मी सात वर्षांपासून सनातन धर्माचे पालन करत आहे. सनातन धर्मातील तर्कशास्त्र अर्थपूर्ण आहे. श्रद्धा आहे; अंधश्रद्धा नाही.हे खूप सुंदर आहे".
भारताला पहिल्यांदा भेट देणाऱ्या जोनाथनने यांनी सांगितले की. पवित्र स्नान हा एक उत्कृष्ट अनुभव आहे. येथील लोक आणि भोजन हे दोन्ही अत्यंत भारावून टाकणारे आहे. भारतातील सर्व तीर्थस्थळे, पवित्र स्थळे आणि मंदिरे पाहणे हा एक आश्चर्यकारक अनुभव आहे. आम्हाला शाही स्नानात सहभागी होण्याची इच्छा आहे. "
जगभरातून भाविक प्रयागराजला येत आहेत. दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि स्पेनमधील यात्रेकरूंनी एएनआयला सांगितले की, आम्ही खूप भाग्यवान आहोत. आम्हाला महाकुंभमेळ्यात सहभागी होता आले. भारत जगाचे आध्यात्मिक हृदय आहे. नदीतील पाणी थंड आहे; परंतु हृदय उबदारपणाने भरलेले आहे", असे ब्राझिलियन भक्त फ्रान्सिस्को यांनी सांगितले.
महाकुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी वाहनांची सुरळीत वाहतूक आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी विस्तृत व्यवस्था केली आहे आणि एक सविस्तर योजना अंमलात आणली आहे.महाकुंभ १२ वर्षांनंतर साजरा होत आहे आणि या कार्यक्रमासाठी ४५ कोटींहून अधिक भाविक येण्याची अपेक्षा आहे.