छत्तीसगडमध्‍ये चकमकीत पाच नक्षलवादी ठार

मंगळवारपासून सुरु होती चकमक, मोठा शस्‍त्रसाठा जप्‍त
Encounter in  Chhattisgarh
नारायणपूरच्या कोहकामेटा पीएस भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 नक्षलवादी ठार झाले आहेत. Representative image

नारायणपूरच्या कोहकामेटा पीएस भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले आहेत, अशी माहिती बस्‍तरचे पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी ANI वृत्तसंस्‍थेशी बाेलताना दिली.

पी. सुंदरराज यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांविरोधात कारवाईइसाठी डीआरजी, एसटीएफ, आयटीबीपी आणि बीएसएफ यांच्‍या संयुक्‍त दलाने कोहकामेटा भागात शोध मोहित राबवली. नारायणपूर जिल्ह्यात मंगळवार, 2 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी झाल्‍या. आतापर्यंत ५ नक्षलींचे मृतदेह सापडले आहेत. माेठा शस्‍त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news