Stray Dogs: तब्बल ५०० भटक्या कुत्र्यांना इजक्शन देऊन संपवलं; सरपंचानं Video केला व्हायरल... पोलीस पोहचले अन् प्रकरण आलं अंगलट

Mass Killing Of Stray Dogs: सरपंचांसह ९ जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्यांनी त्यांच्यावर ५०० भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे
Mass Killing Of Stray Dogs
Mass Killing Of Stray Dogspudhari photo
Published on
Updated on

Mass Killing Of Stray Dogs: तेलंगणामधील हनुमाकोंडा जिल्ह्यातील अरपल्ली आणि शामपेठ गावातील सरपंचांसह ९ जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्यांनी त्यांच्यावर ५०० भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यासाठी त्यांनी प्राणघातक इंजक्शन वापरल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे सरपंचानं कुत्र्यांना प्राणघातक इंजक्शन देतानाचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर भटक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी पोलीस आणि जणावरांचे डॉक्टर दफन केलेल्या जनावरांचे शवविच्छेदन करण्यासाठी गावात गेले होते. त्यावेळी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. परकलचे एसीपी सतीशबाबू यांनी सांगितलं की, करीमनगर जिल्ह्यातील गौतम नावाचा व्यक्तीने भटक्या जनावरांच्या फाऊडेशन आणि एनजीओने वतीने तक्रार दाखल केली होती.'

'त्याने ही तक्रार दाखल शामपेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्याने शामपेठ आणि अरेपल्ली ग्राम पंचायतीच्या हद्दीत शेकडो भटक्या कुत्र्यांना मारण्यात आल्याचा दावा केला होता. त्याने दोन व्यक्तींना या भटक्या कुत्र्यांना जीवघेणी इंजक्शन देण्यासाठी पैसे देण्यात आल्याचा आरोप केरा होता. ६ ते ८ जानेवारीदरम्यान या भटक्या कुत्र्यांचे हत्याकांड घडवणून आणण्यात आलं.'

गावातील वयस्कर नागरिक हे ही तक्रार कोणत्या आधारावर करण्यात आली असा प्रश्न विचारत आहेत. त्यांनी सरपंचांनी ही कारवाई जनतेच्या मागणीवरून केली आहे. निवडणुकीवेळी सरपंच यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. गावांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली होती. त्यामुळे ही मागणी करण्यात आली.

दरम्यान, गौतम यांच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी दोन्ही गावांचे सरपंच आणि त्यांचे पती यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर उपसरपंच, दोन्ही गावांचे सचिव आणि दोन रोजंदारीवरच्या कामगारांविरूद्ध जणावरांसोबतच्या क्रुरता विरोधी कायदा १९६० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news