Karmabhoomi Express Fire | ‘कर्मभूमी एक्स्प्रेस’ला आग; चार डबे आगीच्या भक्ष्यस्थानी

पंजाबमधील भीषण दुर्घटना
पतियाळा : पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यात शुक्रवारी सराय बंजारा रेल्वेस्थानकाजवळ  धावत्या ‘कर्मभूमी एक्स्प्रेस’ला भीषण आग लागल्यानंतर तत्काळ रेल्वे थांबविण्यात आली. यावेळी आगीचे लोट आणि धूर पसरला. याप्रसंगी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
पतियाळा : पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यात शुक्रवारी सराय बंजारा रेल्वेस्थानकाजवळ धावत्या ‘कर्मभूमी एक्स्प्रेस’ला भीषण आग लागल्यानंतर तत्काळ रेल्वे थांबविण्यात आली. यावेळी आगीचे लोट आणि धूर पसरला. याप्रसंगी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
Published on: 
Updated on: 

पतियाळा; वृत्तसंस्था : पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यात शुक्रवारी ‘कर्मभूमी एक्स्प्रेस’ला भीषण आग लागल्याची घटना घडली. सराय बंजारा रेल्वेस्थानकाजवळ धावत्या रेल्वेच्या तीन डब्यांना आगीने वेढले, तर चौथ्या डब्याचे अंशतः नुकसान झाले. काही प्रवाशांनी डब्यातून उड्या घेत जीव वाचवला. या घटनेत सुमारे १,५०० प्रवाशांनी सुखरूप बाहेर पडत जीव वाचवला.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त नाही. अमृतसरहून पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडीकडे जाणाऱ्या या रेल्वेला आग लागल्यानंतर तातडीने थांबवण्यात आले. राजपुरा-सिरहिंद रेल्वे मार्गावर सराय बंजारा स्थानकाजवळ ही घटना घडली. सुरुवातीला एका डब्याला आग लागली होती. मात्र, वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आग अन्य डब्यांमध्ये पसरली.

कर्मभूमी एक्स्प्रेसला लागलेल्या आगीचे थरारक व्हिडीओ व फोटो समोर आले आहेत. आगीच्या ज्वाला आणि परिसरात धुराचे लोट पसरल्याचे यामध्ये पाहायला मिळत आहे. घटनास्थळी आसपासच्या गावातील नागरिकांनी गर्दी केली आहे. आग लागल्याचे कळताच प्रवासी घाबरले आणि त्यांनी ट्रेनच्या बाहेर उड्या मारल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.