

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. सार्वजनिक मालमत्ता कायद्याचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राऊस अव्हेन्यू न्यायालयात १८ एप्रिलला सुनावणी होणार आहे.
यापूर्वी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मतियाला मतदारसंघातील आमदार गुलाब सिंग यांच्याविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, पोलिसांनी तक्रारीची चौकशी केली नाही. त्यामुळे होर्डिंग्स कोणी आणि का लावले याची चौकशी करणे आवश्यक आहे. न्यायालयाने पोलिसांना १८ मार्चपर्यंत या प्रकरणात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. यापूर्वी २०२२ मध्ये द्वारका येथील न्यायालयाने हा खटला फेटाळून लावला होता.