

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत शनिवारी आपला सलग आठवा अर्थसंकल्प सादर करतील. यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदींनीही तसे आपल्या भाषणातून सूचित केले.
2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान, विकासाला चालना देण्याचे सर्वात मोठे आव्हान अर्थमंत्र्यांसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्पात देशातील सर्व गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांवर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहावा, अशीही प्रार्थना केली.