Travel Scam | फेसबुक पेजवरून युरोप ट्रिप बुकिंगचा बनाव; महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरला ११.५ लाखांचा गंडा!

Travel Scam | प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर असल्याचे भासवून केली फसवणूक
Bengaluru Software Engineer Cheated of ₹11.5 Lakh in Europe Trip Fraud via Facebook
प्रातिनिधिक छायाचित्र. Pudhari
Published on
Updated on

Bengaluru Software Engineer Cheated of ₹11.5 Lakh in Europe Trip Fraud via Facebook

बंगळूरु : येथील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला फेसबुकवरील ट्रॅव्हल पेजच्या माध्यमातून युरोप सहलीचे बुकिंग करणे चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाइन ट्रॅव्हल स्कॅमला बळी पडल्यामुळे या महिलेने तब्बल ११.५ लाख रुपये गमावले आहेत.

सहलीसाठी ट्रॅव्हल पॅकेज सर्च

'डेक्कन हेराल्ड'च्या वृत्तानुसार, ईशान्य बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या ३३ वर्षीय महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने ही तक्रार दाखल केली आहे. थनिसंद्रा भागात राहणारी ही महिला एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. सहलीसाठी ट्रॅव्हल पॅकेज शोधत असताना तिला फेसबुकवर 'Jetha Iccha Setha Jai Travels and Events' नावाचे एक पेज दिसले.

Bengaluru Software Engineer Cheated of ₹11.5 Lakh in Europe Trip Fraud via Facebook
Dombivli crime : डोंबिवलीत 'स्पेशल २६' स्टाईलने लूट! तोतया CBI अधिकाऱ्यांनी लावला ७१ लाखांचा चुना

चौकशी करणे पडले महागात, कशी फसवणूक झाली?

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिने युरोप ट्रिपच्या चौकशीसाठी फेसबुक पेजवर दिलेल्या दोन फोन नंबरवर संपर्क साधला. संशयित आरोपींनी तिला सहलीच्या पॅकेजचे सविस्तर तपशील पाठवले आणि ही प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर असल्याचे भासवून तिचा विश्वास संपादन केला. आरोपींनी तिला वेगवेगळ्या नंबरवरून फोन करण्यास सुरुवात केली. व्हिसा प्रक्रिया, विमानाचे बुकिंग, राहण्याची व्यवस्था आणि इतर खर्चाच्या नावाखाली त्यांनी तिला वेळोवेळी पैसे भरण्यास सांगितले. ही ट्रिप खरी आहे असे समजून महिलेने विविध व्यवहारांद्वारे एकूण १२.७७ लाख रुपये ट्रान्सफर केले.

Bengaluru Software Engineer Cheated of ₹11.5 Lakh in Europe Trip Fraud via Facebook
Amazon Refund Scam: रिफंड स्कॅमर गँगचा अमेझॉनला गंडा... टेलिग्रामवरून चालवायचे खास स्कीम, कोट्यावधी रूपयांचा लावला चुना

ट्रिप 'रद्द' केली आणि परतावा नाकारला

पैसे भरल्यानंतर महिलेने सहलीच्या कन्फर्मेशनसाठी ट्रॅव्हल कंपनीशी संपर्क साधला. मात्र, आरोपींनी तिची युरोप सहल रद्द झाल्याचे सांगितले. जेव्हा महिलेने आपले पैसे परत मागितले, तेव्हा त्यांनी केवळ १.१८ लाख रुपये परत केले. उरलेल्या रकमेसाठी तिने वारंवार विनंती करूनही आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली.

Bengaluru Software Engineer Cheated of ₹11.5 Lakh in Europe Trip Fraud via Facebook
Mumbai Digital Arrest: मुंबईत ‘डिजिटल अटकेत’ ठेवून २.८४ कोटींची फसवणूक; ७७ वर्षीय दाम्पत्य सायबर जाळ्यात

पोलीस तपास सुरू

ईशान्य सायबर क्राईम पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. हे फसवणुकीचे रॅकेट नेमके कसे चालवले जात होते आणि यामध्ये कोणाचा हात आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news