पुढारी ऑनलाईन डेस्कः
मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आलेल्या चित्त्यांबाबत एक ‘गुड न्यूज’ आली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी समाजमाध्यमांवरुन ही बातमी दिली आहे. कुनो येथे आफ्रीकेवरुन आणलेल्या चित्यांमधील एक मादी चित्ता गर्भवती राहिली आहे. लवकरच ही मादी पिलांना जन्म देणार आहे. भारतात चित्ता पुर्नवसन अभियानासंदर्भात ही एक महत्वाची घटना आहे. चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी सूरु असलेल्या प्रयत्नांमध्ये हे यश महत्वाचे ठरणार आहे. मुख्यंमत्री यादव यांनी ही बातमी देताना केंद्र सरकारचेही आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हा प्रकल्प खास आहे. त्यांच्या हस्तेच पाच वर्षापूर्वी या अभयारण्यात आफ्रिकेवरुन आणलेल्या चित्त्यांना सोडण्यात आले होत. एकून २४ चित्ते आफ्रिकेवरुन आणण्यात आले होते यामध्ये १२ बछड्यांचाही समावेश होता. पण मध्यंतरी अनेक चित्त्यांचा मृत्यूमुळे या प्रकल्पावर टिका होत होती. सध्या गर्भवती असलेली विरा नावाची मादी चित्ता ही ५ वर्षाची आहे. गेले अनेक दिवस नर चित्ता पवन याच्या बरोबर तिचे वास्तव्य होते. यांच्या संबधातूनच ही मादी गर्भवती राहीली असल्याचे या प्रकल्पाचे प्रमुख उत्तम शर्मा यांनी सांगितले.