

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवक आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फवाद अहमद यांची नियुक्ती करण्यात आली. अहमद यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने अणुशक्ती नगर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. नवाब मलिक यांच्या कन्या सना मालिक यांनी त्यांचा पराभव केला होता. फवाद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती आहेत.
यापूर्वी शरद पवार गटाच्या युवक आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी धीरज शर्मा होते. मात्र त्यांनी शरद पवार गटाची साथ सोडली आणि ते अजित पवार गटात दाखल झाले. त्यानंतर शरद पवार गटात युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद रिक्त होते. काही महिन्यांच्या कालावधीनंतर या पदावर फवाद अहमद यांची निवड करण्यात आली.