

गुरुग्राम : हरियाणातील गुरुग्राममधून माणुसकीला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका नराधम बापानेच दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हरियाणातील गुरुग्राममधील 12 वर्षीय लहान मुलीने शाळेतील शिक्षिकेसमोर व्यथा मांडल्यानंतर हे भयंकर वास्तव जगासमोर आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळीमा फासला गेला आहे.