क्षणार्धात बदलले नशीब! खाणीतून मजुराला 19.22 कॅरेटचा हिरा सापडला

मध्यप्रदेशातील पन्ना येथील घटना; किंमत जाणून घ्या
labour Found Dimond In Found
खाणीतून मजुराला 19.22 कॅरेटचा हिरा सापडलाPudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिऱ्यांच्या खाणीसांठी प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यात एका मजुराला 19.22 कॅरेटचा हिरा सापडला आहे. या हिऱ्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. या पैशातून मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याचे मजूर राजू गौर यांनी सांगितले. बुधवारी (दि.31) मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील एका खाणीत एका मजुराला 19.22 कॅरेटचा हिरा सापडला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारी लिलावात या हिऱ्याची किंमत सुमारे 80 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते. मजूर राजू गौर यांनी सांगितले की, गेली दहा वर्षे माती खोदण्याचे काम करतो, पण एक दिवस आपले नशीब उजळेल असे वाटले नव्हते.

labour Found Dimond In Found
आता हिरा तयार होणार 15 मिनिटांत?

गौर म्हणाले की मला आशा आहे की, लिलावानंतर मिळालेल्या पैशामुळे माझ्या आर्थिक अडचणी कमी होतील. तसेच माझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागेल. कृष्णा कल्याणपूर येथील खाणीत हिरा सापडल्याने खूप आनंद झाला. दरम्यान तो तात्काळ सरकारी अधिकाऱ्यांकडे जमा केल्याचे या मजुराने सांगितले. पुढील लिलावात हा हिरा विक्रीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे पन्ना हिरे कार्यालयाचे अधिकारी अनुपम सिंह यांनी सांगितले. जिल्हा दंडाधिकारी सुरेश कुमार यांनी सांगितले की, खाणीत सापडलेला 19.22 कॅरेटचा हिरा लिलावात 80 लाख किंवा त्याहून अधिक रुपयांना विकला जाऊ शकतो. पुढील लिलावात हा हिरा खुल्या बोलीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

labour Found Dimond In Found
मध्य प्रदेश : हिरा विरुद्ध ऑक्सिजन

गौर यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी हिरा सापडलेली खाण त्यांनी घेतली होती. हा पैसा मी माझ्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करेन आणि शेतीसाठी जमीन विकत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिका-यांनी सांगितले की, खडबडीत हिऱ्यांचा लिलाव केला जाईल आणि सरकारी रॉयल्टी आणि कर कापून मजुरांना पैसे दिले जातील. मध्य प्रदेशातील बुंदेलखंड प्रदेशात असलेल्या पन्ना जिल्ह्यात 12 लाख कॅरेटचा हिऱ्यांचा साठा असल्याचा अंदाज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news