

नवी दिल्ली : भाजपने शेतकऱ्यांना खोटी आश्वासने दिली. ती पूर्ण केली जात नाही म्हणून आमचा अन्नदाता रस्त्यावर आहे. त्यांच्याशी चर्चा करावी असे म्हणत आम आदमी पक्षाने केंद्र सरकारवर टीका केली.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या प्रियंका कक्कड म्हणाल्या की, देशाचा अन्नदाता आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला, हे दुःखदायक आहे. शेतकऱ्यांना आंदोलन करण्यापासून रोखले जात आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असेही त्या म्हणाल्या.
प्रियंका कक्कड म्हणाल्या की, दिल्लीतील जनतेने दोन सरकारे निवडून दिली आहेत. आम आदमी पक्षाचे सरकार लोकांना वीज, आरोग्य, शिक्षण देण्यासाठी काम करत आहे. तर दुसरीकडे लोकांनी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यासाठी भाजपचे ७ खासदार निवडून दिले आहेत मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत आहे, असे म्हणत त्यांनी दिल्लीतील सर्व भाजप खासदार आणि केंद्र सरकारवर तोफ डागली.