पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा बैठक आज केंद्रीय गृहंमत्री अमित शहा यांनी घेतली. यावेळी त्यांनी ८ मार्चपासून मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर लोकांची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरच्या सुरक्षा परिस्थितीबाबत बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी त्यांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. ८ मार्चपासून मणिपूरमधील सर्व मार्गांवर मुक्तपणे सार्वजनिक हालचाली सुनिश्चित करण्याचे आणि अडथळ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्यातील अमली पदार्थांच्या रॅकेटचे उच्चाटन करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकार्यांना दिल्या.