
पुढारी ऑनलाईन डेस्क: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत आज (१० नोव्हे.) रोजी राकेश कुमार शहीद झाले. किश्तवाड जिल्ह्यातील चास व कोतवाडा येथे सुरु असलेल्या दहशदवाद्यांविरोधातील ऑपरेशनमध्ये ते सहभागी झाले होते. राकेश कुमार हे पॅरा मिलेटरी फोर्समध्ये सब इन्सपेक्टर म्हणून कार्यरत होते.
किश्तवाडमधील जंगलात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली. या वेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात राकेश कुमार हे शहीद झाले तर अन्य तीन जवान जखमी झाले आहेत. जखमींना उधमपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चास व कोतवाडा या भागात लष्कराने गस्त वाढवली आहे. सुत्रांनूसार दोन दिवसांपूर्वी दोन ग्रामरक्षकांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. याच ठिकाणी दहशतवादी येथे लपून बसले होते.