Eknath Shinde | दुष्काळ निवारणासाठी केंद्र राज्‍याला भरीव मदत करेल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्‍वास; पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तासभर चर्चा
नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. जवळपास तासभर चाललेल्या या भेटीमध्ये राज्यातील दुष्काळ परिस्थिती, विधान परिषद निवडणूक, राज्यातील आणि केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षपूर्ती, अशा विविध विषयांवर चर्चा झाली.

या बैठकीनंतर दुष्काळाचे संकट मोठे असून केंद्र सरकार दुष्काळ निवारणासाठी राज्याला भरीव मदत करेल, दुष्काळात शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत मंगेश चिवटे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बैठकीत पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील दुष्काळावर आस्थेवाईकपणे माहिती घेतली. राज्यातील दुष्काळाचे संकट मोठे असून शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिल्याचेही शिंदे म्हणाले.

logo
Pudhari News
pudhari.news