

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी 'एक्स'वर शुभेच्छा देताना म्हणाले की, 'एकनाथ शिंदे हे एक गतिशील आणि तळागाळातील नेते आहेत. त्यांचे आयुष्य महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर्पित आहे. जनतेच्या सेवेत त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो.' तर अमित शाह म्हणाले की, 'सार्वजनिक सेवा आणि विकासाप्रती एकनाथ शिंदे यांचे समर्पण कौतुकास्पद आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.' दरम्यान, इतरही विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.