

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील .बनवार रस्त्यावरील सिमरी गावाजवळ आज भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आठ जण ठार झाले आहेत. तर चाैघे गंभीर जखमी आहेत. जखमींना जबलपूरमधील रुग्णालयात करण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त जबलपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती स्थानिक पाेलिसांनी दिली.
दमोह जिल्ह्यातील नोहटा पोलिस ठाण्याअंतर्गत बनवार रस्त्यावर सिमरीजवळ महादेव घाट पुलावरुन बोलेरो नदीच्या कोरड्या असणार्या पात्रात कोसळली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी धाव घेतली. बोलेरोमधून १५ जण प्रवास करत होते. जखमींना पोलिसांनी जबलपूर रुग्णालयात दाखल केले आहे. चालकाचे भरधाव वाहनावरील नियंत्रण गमावल्याने ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.