Heart Attack news | दक्षिण-पूर्व आशियामध्ये दर मिनिटाला 8 जणांचा हृदयविकाराने मृत्यू

Heart disease deaths
देशातील तीन मृत्यूंमागे एकाचा मृत्यू हृदयविकाराने pudhari photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : दक्षिण-पूर्व आशियात दर मिनिटाला आठ लोकांचा हृदयविकाराने मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जागतिक आरोग्य संघटना ‘डब्ल्यूएचओ’ने जागतिक हृदय दिनाच्या (29 सप्टेंबर) पूर्वसंध्येला ही माहिती दिली आहे.

हृदयविकाराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि अधिक लोकांचे प्राण वाचवण्यासाठी व जीवन सुधारण्यासाठी लवकर निदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन पाळला जातो. यावर्षीची थीम (संकल्पना) ‘डोंट मिस ए बीट’ अशी आहे. डब्ल्यूएचओ दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रभारी डॉ. कॅथरिना बोहमे म्हणाल्या, दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशात दर मिनिटाला आठ लोक हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे मरतात. या प्रदेशात हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. हृदयविकाराने होणार्‍या मृत्यूत निम्म्याहून अधिक मृत्यू 70 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये अकाली होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news