अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्‍याशी संबंधित संस्‍थांवर 'ईडी'चे छापे

बेंगळुरूमध्ये कारवाई, केंद्र सरकारविरुद्ध जनमत भडकवण्याचा सोरोस यांच्‍यावर आरोप
George Soros
जॉर्ज सोरोस.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : केंद्र सरकारविरुद्ध जनमत भडकवण्याचा आरोप असलेल्या हंगेरियन वंशाचे अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस ( George Soros) यांच्याशी संबंधित संस्थांवर सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकला. आज (दि. १८) सकाळी ओपन सोसायटी फाउंडेशनशी संबंधितांवर ही कारवाई करण्‍यात आली. याशिवाय, ओपन सोरोस फाउंडेशन (OSF) शी संबंधित इतर काही कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले आहेत. परकीय चलन व्यवस्थापन कायद्या (फेमा)चे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्‍यात आली आहे.

'फेमा' कायद्याचे उल्लंघन केल्याचे आरोप

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ईडीने ओएसएफ आणि काही इतर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांच्या परिसरात छापे टाकले. ओएसएफ ही जॉर्ज सोरोस यांच्या आर्थिक सहायाने चालणारी संस्था आहे. असा आरोप आहे की OSF ने अनेक संस्थांना निधी दिला आणि या निधीचा वापर FEMA कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करतो. आतापर्यंत OSF ने ईडीच्या कारवाईबाबत कोणतेही विधान जारी केलेले नाही.

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या माजी कर्मचाऱ्यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. डिसेंबर २०२० मध्ये अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलला भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, बेकायदेशीरपणे परदेशी निधी मिळाल्याचा आरोप असल्याने त्यांची बँक खातीही सरकारने जप्त करण्याचे आदेश दिले होते.

भाजपने केले होते सोरोस यांच्‍यावर गंभीर आरोप

ह्यूमन राईट्स वॉच आणि अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल यांना जॉर्ज सोरोसच्या ओपन सोसायटी फाउंडेशनकडून निधी मिळत आहे. सीबीआय आणि ईडीने अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलविरुद्ध आधीच चौकशी केली आहे आणि आरोपपत्र देखील दाखल केले आहे. अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात जॉर्ज सोरोस यांच्या भूमिकेबद्दलही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले हाेते. OSF ची सुरुवात जॉर्ज सोरोस यांनी १९९९ मध्ये केली होती. भाजपने आरोप केला हाेता की, काँग्रेस पक्ष जॉर्ज सोरोसच्या सहकार्याने देशाला 'अस्थिर' करण्याचा प्रयत्न करत आहे. जॉर्ज सोरोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत आणि त्यांच्याकडे ७.२ अब्ज डॉलर्स म्हणजेच ६१ हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते.

फक्त एका वर्षात ४ लाख डॉलर्सपेक्षा जास्त निधी मिळाला

जॉर्ज सोरोसच्या संस्थांनी २०२१ मध्ये भारतात ४ लाख डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केले. परकीय चलन घोटाळ्याचा भाग म्हणून ओएसएफ आणि काही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांच्या परिसराची झडती घेण्यात येत आहे. हे प्रकरण ओपन सोरोस फाउंडेशन (OSF)शी थेट परकीय गुंतवणूक (FDI) मिळाल्याच्या कथित आणि काही लाभार्थ्यांनी FEMA मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून निधीचा वापर केल्याच्या कथित आरोपाशी संबंधित आहे.

'ओएसएफ'कडून प्रतिक्रिया नाही

ईडीच्या कारवाईबाबत ओएसएफकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हंगेरियन-अमेरिकन राजकीय कार्यकर्ते सोरोस आणि त्यांची संघटना ओएसएफवर सत्ताधारी भाजपने देश हितांविरुद्ध काम केल्याचा आरोप केला आहे. अदानी-हिंडेनबर्ग वादादरम्यान त्यांनी केलेल्या विधानांवरही पक्षाने टीका केली होती. 'ओएसएफ'ने १९९९ मध्ये भारतात काम सुरू केले. भारताव्यतिरिक्त जॉर्ज सोरोस चीन, रशिया सारख्या देशांमध्ये सरकारे अस्थिर करण्यासाठी निधी दिल्‍याचाही आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news