महादेव बेटींग ॲपशी संबंधित 388 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

माहिती अंमलबजावणी संचालयाने केली कारवाई
ED Action
महादेव बेटींग ॲपशी संबंधित 388 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्तfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महादेव ऑनलाइन सट्टेबाजीतील मनी लाँड्रिंगच्या केसमध्ये ईडीकडून मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. या कारवाई दरम्यान सुमारे 388 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. असे वृत्त 'पुढारी न्यूज'ने दिले आहे. या प्रकरणामध्ये छत्तीसगडमधील विविध उच्चपदस्थ राजकारणी तसेच नोकरशहांवर संशय असल्याचीमाहिती अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी दिली.

ED Action
Mahadev App case : महादेव बेटिंग अॅप प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पथक

ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये जंगम मालमत्तांचा समावेश आहे. यामझ्ये मॉरिशमधील कंपनी टॅनो इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज फंड, दुबईस्थित हवाला ऑपरेटर हरी शंकर टिबरेवाल यांच्याशी संबंधित ईएफपीआय आणि एफडीआयच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक आणि छत्तीसगड, मुंबई आणि अनेक बेटिंग ॲप्स आणि वेबसाइट्सचे प्रवर्तक, पॅनेल ऑपरेटर आणि प्रवर्तक यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील मालमत्ता प्रवर्तकांच्या सहकाऱ्यांच्या नावावर आहेत.

ED Action
राजन गवस यांच्या मुलांच्या नावे व्हॉट्स अॅप उघडून फसवणूक करणाऱ्यास अटक

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले की,जप्तीचा आदेश 5 डिसेंबर रोजी जारी करण्यात आला होता. या मालमत्तांची एकूण किंमत 387.9 कोटी रुपये आहे. या प्रकरणी एजन्सी टिबरेवाल यांची चौकशी करत आहे. दरम्यान, या तपासादरम्यान ईडीने आतापर्यंत 2 हजार 295.61 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news