

नवी दिल्ली: नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या विरोधात निवडणूक आयोग चौकशी करणार आहे. प्रवेश वर्मा यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार आम आदमी पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गुरुवारी केली होती.
त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली निवडणूक आयुक्तांना सदर तक्रारीतील आरोपांची वस्तुस्थिती शोधून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आदर्श आचारसंहितेनुसार तातडीने योग्य ती कारवाई करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीच्या निवडणूक आयुक्तांना सांगितले आहे. त्यानंतर कारवाईचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यासही सांगितले आहे.
आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाकडून मतदान यादीत घोळ झाल्याची तक्रार ही प्राप्त झाली आहे. यासंबंधी देखील चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिल्लीच्या निवडणूक आयुक्तांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.