Ebola India Bengaluru: इबोला भारताच्या वेशीवर; बंगळुरू विमानतळावर युगांडाच्या महिलेमध्ये लक्षणे

Ebola India Bengaluru
Ebola India Bengalurupudhari
Published on
Updated on

Ebola India Bengaluru: युगांडाच्या २८ वर्षाची महिला केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचली होती. या महिलेला इबोलासदृष्य लक्षणे आढळून आल्यानंतर इंदिरानगर रूग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तिला खबरदारी म्हणून रूग्णालयात दाखल केल्यानंतर तिचे सॅम्पल्स घेऊन इबोला टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

Ebola India Bengaluru
Mumbai Hospital Violence : कुर्ल्यात प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांकडून महिला डॉक्टरांना मारहाण

लक्षणांबाबत अजून शंका

आरोग्य विभागाचे सचिव रित्विक रंजनाम पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला तापासारखी सामान्य लक्षणे नव्हती. तिच्या लक्षणांबाबत आम्ही अजूनही साशंक आहोत. रूग्णालय आरोग्या विभागाने या महिलेला थकवा जाणवत असल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही तिचे सॅम्पल घेण्याचा निर्णय घेतला. तिचे सॅम्पल पुण्याच्या राष्ट्रीय व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Ebola India Bengaluru
Pune Airport Ebola Virus Alert: इबोला व्हायरस अलर्ट: पुणे विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग व कडक तपासणी सुरू

प्रकृती स्थीर

आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की महिलेने युगांडावरून आल्यानंतर हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. मात्र सौम्य लक्षणे जाणवू लागल्यानंतर नंतर तिला सरकारी रूग्णालयात शिफ्ट करण्यात आलं. प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार तिची सध्या प्रकृती स्थीर आहे. तिच्या प्रकृतीवर बारीक नजर ठेवली जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रोटोकॉलनुसार तिची रिपीट टेस्ट देखील घेण्यात आली आहे. तिच्या पहिल्या चाचणीचा रिपोर्ट अजून मिळालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news