दिल्लीपाठोपाठ बिहारमध्येही भूकंपाचे धक्के

भूकंपाचा केंद्रबिंदू सिवान जिल्‍ह्यात, ४.० रिश्टर स्केल तीव्रतेनं हादरला परिसर
Bihar Earthquake
प्रातिनिधिक छायाचित्र.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्ली-एनसीआरमध्ये आज (दि.१७) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सुमारे अडीच तासांनंतर बिहारमध्येही बिहारमध्ये ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर एकच घबराट पसरली. लोक घराबाहेर पडले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र बिहारच्या सिवान जिल्ह्यात होते.

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

आज सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पहाटे ५.३६ वाजता भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) नुसाररिश्‍टर स्‍केलवर याची तीव्रता ४.० इतकी होती. अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लोकांना संयम राखावा, सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आणि संभाव्य भूकंपानंतरच्या धक्क्यांपासून सावध राहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

बिहारमध्‍ये ७ जानेवारी रोजी झाला होता भूकंप

७ जानेवारी २०२५ रोजी बिहारमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोनदा भूकंपाचे धक्के तीनदा जाणवले होते. पटनासह अनेक जिल्ह्यांमध्ये लोकांना हा भूकंप जास्त जाणवला. भूकंपाचे केंद्र तिबेटच्या झिझांग भागात जमिनीपासून सुमारे १० किमी खाली होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news