E20 Petrol Case: E20 पेट्रोलमुळे कार बिघडली; ग्राहक आयोगाचा ऐतिहासिक निर्णय, कंपनीला नवी कार देण्याचे आदेश

E20 Petrol Consumer Court: रायपूर ग्राहक आयोगाने E20 पेट्रोलमुळे कारमध्ये बिघाड झाल्याचा दावा करणाऱ्या वाहनमालकाच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
E20 Petrol Consumer Court
E20 Petrol Consumer CourtPudhari
Published on
Updated on

E20 Petrol Consumer Court: देशभरात E20 इंधनाबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान छत्तीसगडमधील रायपूर जिल्हा ग्राहक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. E20 पेट्रोलमुळे कारमध्ये गंभीर बिघाड झाल्याचा दावा ग्राहकाने केला हा दावा मान्य करत आयोगाने वाहन कंपनीला नवीन कार देण्याचे आदेश दिले आहेत. E20 इंधनाशी संबंधित अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

तक्रारदाराने प्रसिद्ध वाहन उत्पादक मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड विरोधात ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. त्यांचा दावा होता की, E20 पेट्रोल वापरण्यास सुरुवात केल्यानंतर कारच्या इंजिनमध्ये वारंवार बिघाड होऊ लागला. इंजिनची कार्यक्षमता कमी झाली, मिसफायरिंगची समस्या निर्माण झाली आणि वाहनाचे मायलेजही घटले.

तक्रारदाराने अनेक वेळा अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये कार दुरुस्तीसाठी दिली. मात्र काही दिवसांत पुन्हा गाडीत बिघाड होत होता. याचा मोठा आर्थिक फटका बसल्याचे ग्राहकाने आयोगासमोर सांगितले.

दुसरीकडे, वाहन कंपनी आणि डीलरने आयोगासमोर दावा केला की संबंधित कार मॉडेल E20 इंधनासाठी पूर्णपणे सक्षम आहे. वाहनातील बिघाड हा चुकीच्या देखभालीमुळे किंवा नियमित झिजेमुळे झाला असून त्याचा E20 इंधनाशी संबंध नसल्याचे कंपनीचे म्हणणे होते.

मात्र तक्रारदाराने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये वाहनाच्या इंजिनमध्ये E20 इंधनाचे अवशेष साचल्याचे, तसेच पेट्रोल टाकीत पांढऱ्या रंगाचे चिकट द्रव आढळल्याचे नमूद करण्यात आले. वाहनाची अनेकदा दुरुस्ती करूनही समस्या कायम असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे तपासल्यानंतर ग्राहक आयोगाने तक्रारदाराच्या बाजूने निर्णय दिला.

E20 Petrol Consumer Court
Siya Goyal Family Business: सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर मोठी कारवाई; FDAने थेट व्यवसायच बंद केला, 8 लाखांचा माल जप्त

आयोगाने मारुती सुझुकीला 45 दिवसांच्या आत तक्रारदाराला त्याच मॉडेलची E20 इंधनाशी सुसंगत नवीन कार देण्याचे आदेश दिले आहेत. जर कंपनीने निर्धारित कालावधीत नवीन वाहन उपलब्ध करून दिले नाही, तर कारची संपूर्ण किंमत म्हणजेच 20.50 लाख रुपये परत करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

E20 Petrol Consumer Court
Sonam Wangchuk Hunger Strike: 'प्रकृती खालावली, पण...', 18 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांचं देशवासीयांना मोठं आवाहन

याशिवाय, तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासासाठी 1 लाख रुपयांची नुकसानभरपाई आणि न्यायालयीन खर्चापोटी 10 हजार रुपये देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे E20 इंधनाशी संबंधित वाहनांच्या कार्यक्षमतेबाबत सुरू असलेल्या चर्चेला नवे वळण लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news