

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात पाणी साचले असून त्यामुळे नागरिकांना वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (दि.12) चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम, चेंगलपट्टू, कुड्डालोर, मायिलादुथुराई, नागापट्टिनम, तंजावूर, तिरुवरूर, पुदुक्कोट्टई, रामनाथपुरम, विल्लुपुरम जिल्हे, पुद्दुचेरी आणि कराईकल परिसरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.