पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील सर्वच राज्यांमध्ये उन्ह्याचे चटके वाढू लागले आहेत. तापमान वाढीने एकीकडे सर्वसामान्यांची होरपळ होत असताना मुक्या प्राण्यांचेही भयंकर हाल होताना दिसतात. अशीच पाण्यावाचून प्राण्यांची हाेणारी तडफड मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानातील ( Kuno National Park) कर्मचार्याला पाहवली नाही. त्याने तहानलेल्या चित्यांना पाणी पाजले. मात्र नियम उल्लंघन प्रकरणी वनविभागाने त्याला नोकरीवरुन कमी केले आहे.
कुनो राष्ट्रीय उद्यानात चालक म्हणून सत्यनारायण गुर्जर नोकरी करत होता. त्याने चित्त्यांना पाणी देतानाचा व्हिडिओ शूट केला. गुर्जर चित्त्यांना पाणी देताना दिसत आहे. रेंज नेकेडरने हा व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला. वन विभाग या प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणी इतर कर्मचाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते.
सत्यनारायण गुर्जर चित्त्यांना पाणी देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याला नियमांचे उल्लंघन मानले आहे. त्यामुळे सत्यनारायण गुर्जर याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेंज नाकादार यांनी हा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. वन विभाग आता या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. या प्रकरणात आणखी काही कर्मचाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते, असे मानले जात आहे.
व्हिडिओमध्ये, मादी चित्ता ज्वाला तिच्या चार पिलांसह पाणी पिताना दिसत आहे. देखरेख पथकातील एक सदस्य त्यांना 'चला...' म्हणतो आणि प्लेटमध्ये पाणी ओततो. यानंतर ज्वाला तिच्या मुलांसह पाणी पिण्यासाठी येतात. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.