Gold Smuggling Case | तब्‍बल २१ किलो परदेशी सोने जप्‍त

सोन्‍याच्‍या तस्‍करीचा पर्दाफाश : पाचजणांना अटक
Gold Smuggling Case |
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दोन स्वतंत्र कारवायांमध्ये २१ किलो परदेशी बनावटीचे सोने जप्त केले.
Published on: 
Updated on: 

नवी दिल्‍ली; वृत्तसंस्‍था : परदेशातून भारतात आणले जाणारे तस्करीचे सोने पकडण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दोन स्वतंत्र कारवायांमध्ये २१ किलो परदेशी बनावटीचे सोने जप्त केले असून त्याची किंमत सुमारे ३२ कोटी रुपये आहे. या प्रकरणात पाचजणांना अटक करण्यात आली आहे. तस्‍करीचे हे सोने म्‍यानमार आणि नेपाळमधून भारतात आणल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी हरियाणातील पलवलजवळील टोल प्लाझाजवळ दोन नवीन थार गाड्या अडवल्या. या दोन्ही वाहनांच्या चेसिसमध्ये मागील चाकाजवळ विशेष पद्धतीने गुप्त कप्पा तयार करण्यात आला होता. चेसिसचा एक भाग कापून पुन्हा वेल्डिंग केल्याने हा कप्पा सहजपणे लक्षात येत नव्हता. मात्र, अधिकाऱ्यांनी वाहनांची बारकाईने तपासणी केल्यानंतर हा गुप्त कप्पा शोधून काढला. या दोन्ही वाहनांमधून १५.१८ किलो सोन्याच्या लगडी जप्त करण्यात आल्या. या सोन्याची किंमत सुमारे २३.३० कोटी रुपये असल्याचे डीआरआयने सांगितले. ही कावाई १९ सप्टेंबरला करण्यात आली असून, वाहनांमध्ये असलेल्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे सोने म्यानमारमधून तस्करी करून आणल्याचा संशय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news